इचलकरंजी शुक्रवारपासून नव तेजस्विनी महोत्सव…..

महिला आर्थिक विकास महामंडळ व इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने इचलकरंजी येथे नव तेजस्विनी महोत्सव होणार आहे. हा महोत्सव 23 ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये वर्धमान चौक येथील वंदे मातरम क्रीडांगणावर होणार आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या नवतेजस्विनी महोत्सवात महाराष्ट्र ग्रामीण महिला उदयम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटांची उत्पादनाचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी 9 या वेळेत हा महोत्सव असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन हे शुक्रवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे.

बचत गटातील महिलांनी तयार केलेली लोणची, पापड, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मसाले, नाचणी, गुळ, तांदूळ, मातीची नक्षीदार भांडी, साड्या, ज्वेलरी व लहान मुलांचे कपडे आणि खेळणी, बिस्किटे, हर्बल उत्पादने आदींसह विविध खाद्यपदार्थांची रेलचेल या महोत्सवांमध्ये असणार आहे.