गुरुवारपासून निवासी डॉक्टर संपावर….

 राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टर म्हणजेच मार्ड डॉक्टरांना आश्वासन मिळूनही त्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नाहीयेत. अशातच गुरुवारापासून मार्डच्या डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे. 

निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत डॉक्टरांची चर्चा झाली होती. डॉक्टरांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने गुरुवारपासून निवासी डॉक्टरांनी संप पुकारणार आहेत.