आष्ट्याजवळ भीषण अपघात…..

अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ होत आहे. असाच एक भीषण अपघात आष्टा इस्लामपूर मार्गावर झाला आहे. यामध्ये तरून जागीच ठार झालेला आहे. आष्टा इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्याजवळ केमिकल ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत अतुल अशोक कदम वय २७ राहणार पडळवाडी ता वाळवा या युवकाच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने तो जागीच ठार झाला.ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली.

आष्टा पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अतुल कदम हा कोल्हापूर येथे हॉटेल कामगार असून तो पडवळवाडी गावी आईला भेटण्यासाठी आला होता. दुपारी कोल्हापूर कडे कामासाठी मोटरसायकल क्रमांक एम एच १० ई सी ६९४७ वरून जात असताना इस्लामपूर आष्टा मार्गावर नवीन शिंदे मळ्यामजीक समोरून भरधाव वेगात येणाऱ्या केमिकल ट्रक क्रमांक एम एच १३ डी क्यू ३७०९ व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत डोक्याला गंभीर मार लागल्याने अतुल कदम जागीच ठार झाले.