बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. काल गुरुवारी हिंदीचा पेपर झाला. गुरुवारी झालेल्या हिंदी विषयाच्या पेपरला ४४४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. १२ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची सुरुवात बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. गुरुवारी हिंदीचा दुसरा पेपर झाला. यासाठी शहर – जिल्ह्यातील १३ हजार १६३ विद्यार्थ्यांनी पेपरसाठी नोंदणी केली होती. त्यातील १२ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ४४ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने भरारी पथके नेमली असून, त्या पथकांनी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्राला भेटी दिल्या. केंद्रावर बैठे पथक असल्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा होत आहेत.