राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA – National Testing Agency) ने यूजीसी नेट जून 2025 परीक्षा (UGC NET June 2025 Exam) यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे सर्टिफिकेट जारी केले आहे. आता पात्र उमेदवार आपले सर्टिफिकेट अधिकृत संकेतस्थळावरून सहज डाउनलोड करू शकतात.
ही परीक्षा 25 जून ते 29 जून 2025 दरम्यान कंप्युटर आधारित मोड (Computer Based Test – CBT) मध्ये पार पडली होती. यामध्ये देशभरातून तब्बल 10 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर सुमारे 7.5 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. याचा निकाल जुलै 2025 मध्ये जाहीर करण्यात आला होता.
निकालानुसार एकूण 1,28,179 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. त्यापैकी 5,269 उमेदवारांना ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र मानले आहे. तर 54,885 उमेदवार केवळ असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी प्रवेशासाठी योग्य ठरले आहेत.
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज क्रमांक , जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून लॉगिन करावे. त्यानंतर सर्टिफिकेट पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून प्रिंट घेता येईल.
सर्टिफिकेट कसे डाउनलोड कराल ?
सर्टिफिकेट डाउनलोड करताना अडचण आल्यास उमेदवारांनी थेट NTA शी संपर्क साधावा. त्यासाठी ईमेल आयडी ugcnet@nta.ac.in आणि ecertificate@nta.ac.in उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यूजीसी नेटचे सर्टिफिकेट उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे ठरवणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याचा उपयोग असिस्टंट प्रोफेसर पदाच्या भरतीत आणि पीएचडी प्रवेश प्रक्रियेत होतो.
यूजीसी नेट म्हणजे काय आणि का महत्त्वाचं ?
यूजीसी नेट म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट . ही एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून तिचे आयोजन राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) करते. या परीक्षेचा उद्देश म्हणजे भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी योग्य असिस्टंट प्रोफेसर आणि संशोधनासाठी पात्र उमेदवारांची निवड करणे. जे उमेदवार या परीक्षेत पात्र ठरतात त्यांना उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापनासोबतच संशोधनाच्या संधी मिळतात.
