सांगोला तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतचे सदस्य अर्जुन साळुंखे, अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दिलीप माळी आदींचे सदस्यत्वदेखील तीन अपत्य असल्याने रद्द झाले आहे.
माळशिरस तालुक्यातील बचेरी ग्रामपंचायतचे सदस्य शालन माने यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. तीन अपत्य असल्याने सदर तिघांचे सदस्य पद रद्द झाले आहे.शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने तसेच निवडणूक संपल्यानंतर वेळेत निवडणूक खर्च सादर न करणे यासह इतर कारणांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील ३ ग्रामपंचायतीच्या सरपंचांना तसेच १४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केले आहे.
२०२१ व २०२२ दरम्यान या ग्रामपंचायत संबंधित तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या. यावर सुनावणी झाल्या. मंगळवार, १० डिसेंबर रोजी यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निकाल दिला.दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेजश्री संजय गायकवाड यांचे सरपंच पद रद्द झाले आहे. यासोबत मनगोळी ग्रामपंचायतचे सदस्य अंजली चव्हाण, नूरजहाँ शेख, शांताबाई कांबळे, बलभीम खांडेकर यांचे पद देखील रद्द झाले आहे.
या सर्वांनी वेळेत निवडणूक खर्चाचा तपशील सादर केलेला नव्हता.माढा तालुक्यातील रांझणी ग्रामपंचायतच्या एकूण ७ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. सात सदस्यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार प्रशासनाकडे दाखल झाली होती. यात सोनाली माने, रोहिदास गायकवाड, नेताजी चमरे, संगीता पाटोळे, चंचला पाटील, प्रीतम पाटील, दीपाली गायकवाड आदींचे सदस्यत्व रद्द झाले आहे.
बार्शी तालुक्यातील खडकोणी ग्रामपंचायतचे सदस्य मनीषा कोथमिरे तसेच गीता आगाव यांचेही सदस्यत्व रद्द झाले आहे.पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील हिवरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य अनिता पवार यांचे पद रद्द झाले आहे. अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड यांचेही पद रद्द झाले आहे.