इंग्रजांच्या राजवटीत तयार झालेले आणि १८६२ पासून अस्तित्वात असलेले तीन फौजदारी कायदे नुकतेच केंद्र सरकारनं बदलले. या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी १ जुलैपासून देशभरात सुरु होणार आहे.
भारतीय साक्ष अधिनियम २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ या तीन कायद्यांच्या अंलबजावणीचं केंद्रीय गृहमंत्रालयानं २३ फेब्रुवारी २०२४ रोजी नोटिफिकेशन काढलं आहे. या नोटिफिकेशननुसार, १ जुलै २०२४ पासून या तिन्ही कायद्यांची देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळं आता जनतेला, पोलिसांना तसेच कायद्याचा अभ्यास करणाऱ्या वकिलांना या नव्या कायद्याची माहिती आणि अभ्यास करणं क्रमपात्र ठरणार आहे.