पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची नळावरील भांडणे नेहमीच चर्चेत असतात. पण एखाद्या नळपाणी योजनेसाठी दोन गावातील महिलांनी एकमेकांविरोधात पदर खोचून लढण्याचा प्रकार बहुधा प्रथमच इचलकरंजी विरुद्ध कागल तालुका असा घडत आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या दूधगंगा नळपाणी योजनेचे काम गतीनेव्हावे यासाठी ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या संघटनेच्या माध्यमातून चार दिवस महिलांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडे पाणी योजनेबाबत बैठक घेतील असे पत्र वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर काळ उपोषणाची सांगता झाली.
पाठोपाठ इचलकरंजी नळपाणी योजना कायमस्वरूपी रद्द करावी यासाठी सोमवारपासून कागल तालुक्यातील दुधगंगा बचाव कृती समिती ‘आम्ही जिजाऊ च्या लेकी’ च्यावतीने सुळकूड येथील नदी बंधाऱ्यावर बेमुदत सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना आंदोलक महिलांनी सादर केले.