आता सांगोल्यातही थांबणार कलबुर्गी एक्स्प्रेस

सांगोला हा भाग सगळ्यांच्याच नजरेत आहे कारण या ठिकाणी खूपच पाणीटंचाई जाणवते. कोल्हापूर ते कलबुर्गी एक्स्प्रेसला सांगोला स्थानकात थांबा मंजूर झाला आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या देवस्थानांसाठी धावणाऱ्या या एक्स्प्रेसला मोजकेच थांबे दिले आहेत.

त्यामुळे सांगोल्यासारख्या काही मोठ्या गावांतील भाविकांना या एक्स्प्रेसने धार्मिक पर्यटनासाठी जाता येत नव्हते. ती सांगोल्यात थांबावी यासाठी निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. रेल्वे मंत्रालयाचे संयुक्त निर्देशक विवेककुमार सिन्हा यांनी या गाडीला सांगोल्यात थांबा मंजूर केल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.