सोलापुर जिल्ह्यातील ११८ पैकी एकाही केंद्रावर…….

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे भाषा विषयाचे पेपर शुक्रवारी (ता. २३) संपले. सोलापुर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर ही परीक्षा होत असून पहिल्या तिन्ही पेपरवेळी एकही कॉपी प्रकरण समोर आलेले नाही हे विशेष.इंग्रजी, हिंदी व मराठी विषयांचे पेपर कॉपीमुक्त पार पडल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दिली.

सोलापुर जिल्ह्यात करमाळ्यातील महात्मा गांधी विद्यालय, बार्शीतील सुलाखे हायस्कूल, माढ्यातील नूतन विद्यालय (कुर्डुवाडी), अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय, पंढरपुरातील ह. द. कवठेकर प्रशाला, मोहोळमधील नागनाथ विद्यालय, सांगोल्यातील सांगोला विद्यामंदिर, मंगळवेढ्यातील न्यू इंग्लिश स्कूल, अक्कलकोटमधील शहाजी हायस्कूल, सोलापुरातील भारती विद्यापीठ ज्यू. कॉलेज (विजयपूर रोड) व मुरारजी पेठेतील संभाजीराव शिंदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची परिरक्षक केंद्रे आहेत. त्याअंतर्गत असलेल्या ११८ परीक्षा केंद्रांना तेथूनच प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वितरित होतात. शुक्रवारी मराठी विषयाच्या पेपरला पंढरपूर तालुका व सोलापूर शहरातील एकूण ३२१ विद्यार्थी गैरहजर राहिले. एकूण ३८ हजार २७६ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात मराठी विषयाचा पेपर सोडविला.