खूशखबर! पीएम किसान योजनेच्या 16व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली..

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये जमा होणार आहे.पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हफ्ता उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक निधी देण्यात येतो.

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा पंधरावा हफ्ता नोव्हेंबर महिन्यात मिळाला होत्या, त्यानंतर शेतकरी सोळाव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी, 28 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी करतील. सुमारे नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन हफ्त्यांमध्ये दिली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात.