इस्रायल-पॅलेस्टिनी यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या सुमारे १६०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर या युद्धाचे भयानक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
जगभरातील लोकं सोशल मीडियावर या युद्धाबाबत स्पष्टपणे आपली मतं मांडत आहेत. अॅडल्ट स्टार मिया खलिफाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पॅलेस्टिनीचे समर्थन करणारे ट्वीट केले. हे ट्वीट मिया खलिफाला चांगलेच महागात पडले आहे.
मियाने एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थितीकडे पाहत असाल आणि पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात आणि इतिहास हे काळानुसार दाखवेल.’ या ट्विटवरून मिया खलिफाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिच्यावर टीका केली जात आहे.
मियाने केलेल्या ट्विटने रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांची कंपनी यूएस आणि युरोपमध्ये प्रसिद्ध होम ग्रोथ किट्सचे उत्पादन आणि विक्री करते. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने मिया खलिफाला कंपनीत घेतले होते. मिया या कंपनीचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणार होती.
रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांना इस्रायलविरुद्ध हमासवरील पोस्टबद्दल धमकी देण्यात आली आहे. यानंतर त्याने सोशल मीडियावरच मिया खलिफाला कामावरून काढून टाकल्याची घोषणा केली. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. पण या ट्विटमुळे मियाने तिची नोकरी गमावली आहे.
अॅडल्ट चित्रपटांसाठी ओळखली जाणारी मिया खलिफा इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धाबद्दल स्पष्टपणे बोलली. पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ तिने नुकताच केलेल्या वक्तव्याने लेबनानी-अमेरिकन माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि नव्या चर्चेला उधाण आले. मियाच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.