कोल्हापूर, सांगली महापूर नियंत्रणासाठी मोठी घोषणा!

राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला.अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे.

महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पात कोल्हापूर, सांगली महापूर नियंत्रणासाठी उपाययोजनाची घाेषणा करण्‍यात आली .

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरासारख्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्‍यासाठी जागतिक बँक सहाय्यित 3 हजार 200 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प सुरु करण्‍यात येणार आहे, अशी घाेषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.