आज आणि उद्या अनेक ठिकाणी वरुणराजा बरसणार……

पुढील 48 तास राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रसह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं आहे, तर अनेक ठिकाणी गारपीटही पाहायला मिळत आहे. नव्याने सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशाच्या हवामानावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आज आणि उद्या अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.भारतील हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आजपासून 1 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची रिमझिम दिसणार आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.गेल्या दोन दिवसांत राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः कापणीसाठी तयार झालेल्या उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पावसाचा इशारा दिला होता, मात्र नुकसान टाळता आलेलं नाही.

पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह  गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.