सांगली जिल्ह्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाला असून जत, आटपाडी तालुक्यांतील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टॅंकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अजूनही येत आहे.
परंतु टॅंकरने पाणी देताना जनावरांचा हिशेबच धरला जात नाही.त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातील सत्तर टक्क्यांहून अधिक जनावरे माणसाच्या वाट्यातील पाण्यावर जगवली जात आहेत.
जनावरांना पाणी कसे उपलब्ध करायचे असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. त्यामुळे जनावरांना पाणी द्या, अशी मागणी करत असले तरी, याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये या वर्षी टंचाई जाहीर करण्यात आली आहे. त्यांपैकी जत आणि आटपाडी तालुक्यांतील सिंचनापासून वंचित गावांतील स्थिती गंभीर आहे.