महायुतीचे ११ आमदार तरी सोलापूरला…..

राज्याच्या अर्थसंकल्पातून सोलापूर शहर- जिल्ह्यासाठी काहीतरी ठोस मिळेल, असा विश्वास सर्वांनाच होता. एका विधान परिषदेच्या आमदारासह जिल्ह्यात महायुतीचे ११ आमदार आहेत.

परंतु, पंढरपूर- फलटण रेल्वे मार्ग वगळता सोलापूर जिल्ह्यासाठी ठोस असे काहीच मिळाले नसल्याने सोलापूरकरांच्या पदरी निराशाच पडली आहे.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख करीत त्याच्या अंमलबजावणीनंतर किती जणांना लाभ मिळेल, याचा आवर्जून या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी उल्लेख केला.

त्यात सोलापूरच्या रे नगर व सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्गाचाही उल्लेख झाला. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी एखादा मोठा उद्योग उभारला जाईल किंवा सोलापूरची विमानसेवा कधीपासून सुरू होईल, यासंदर्भात काहीही उल्लेख झाला नाही.