३ पाटलांचा सांगली मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरु

लोकसभेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सांगलीमध्ये लोकसभेच्या मैदानासाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल पाटील आणि अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या तिघांनी मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील, संजय काकापाटील आणि चंद्रहार पाटील या तिघा पाटलांनी प्रचाराचा धडाका सुरू करून लोकसभा निवडणुकीत सध्या चांगलीच रंगत आणली आहे.सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कोणाला उमेदवारी मिळेल याची शाश्वती अद्याप नाही.

मात्र तरी देखील लोकसभेच्या निवडणुकीसाठी सध्याचे भाजप खासदार संजय काका पाटील आणि गतवेळी निवडणूक लढवलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि संभाव्य काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील, त्याचबरोबर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारीत असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे आता डबल महाराष्ट्र केसरी पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा लोकसभेसाठी तिरंगी लढत होण्याची चित्र सध्या पाहायला मिळत आहे.