इचलकरंजी 29,महाराष्ट्रात सुंदर बसस्थानक अभिमान राबवले जात असून या अभियानात विविध संघटना,सामाजिक संस्था,उधोगसमूह,दानसुर व्यक्ती यांचा सहभाग वाढत आहे. इचलकरंजी शहरात प्लास्टिक पुनर्वापर अभियान या समूहात काम करणाऱ्या डॉक्टर, वकील,शिक्षिका, गृहिणी यांनी आज इचलकरंजी बसस्थानकास रिकाम्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या ,खाद्यपदार्थ चे प्लास्टिक वेस्टन,रिकाम्या प्लास्टिक पिशव्या टाकण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक मोठी जाळीची लोखंडी पेटी भेट देण्यात आली.
तसेच नजिकच्या कालावधीत आणखी तीन पेट्या बसस्थानकावर व डेपो मध्ये एक पेटी देणार असल्याचे डॉ वंदना बडवे यांनी या प्रसगी सांगितले.स्वागत व प्रास्तविक सागर पाटील साहेबांनी केले .या चांगल्या उपक्रमा बाबत आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांनी महिला कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व सुंदर बसस्थानक योजनेमध्ये सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक(वरिष्ठ) संजय चव्हाण साहेब,सागर पाटील साहेब,वाहतूक नियंत्रक नाईक,श्रीकृष्ण खामकर साहेब लेखनिक सवाईराम ,सुतार मॅडमचालक,वाहक ,प्रवाशी व या अभियान राबवणाऱ्या डॉ वंदना बडवे,डॉ मधुरा देशपांडे, डॉ सारिका देशमुख, प्रतिभा जठार,राजश्री बेलकर, अॅड माधुरी काजवे व डॉ ज्योती बडे उपस्थित होते .