प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी वतीने 03 मार्च रोजी मुद्रण दिनाचे आयोजन!

मुद्रण कलेचेजनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जयंती प्रित्यर्थ जगभरामधील मुद्रक बांधव ‘जागतिक मुद्रण दिन’ साजरा करतात. प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजीच्या वतीने रविवार, दि. 03 मार्च 2024 रोजी रामपुष्प लॉन, टाकवडे रोड येथे सायंकाळी 5.00 वा. मुद्रण दिन व मुद्रक कौटुंबिक स्नेहसंम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमध्ये जेष्ठ तज्ञांचे मार्गशन व मुद्रक बांधवांच्या व्यवसाय वाढीसाठी विविध स्टॉल्स आहेत. तसेच जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा.

शिवाय कौटूंबिक स्नेह मेळावा असल्याने डान्स, गाणी, फनी गेम्स्‌ असा विविध मनोरंजनात्म कार्यक्रम आहे. या अनुषंगाने मुद्रकांच्या भेटीगाठी व संवाद घडावा हा उद्देश आहे. तरी सर्व मुद्रक बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजीच्या वतीने सचिव रणजीत पाटील यांनी केले.