सर्वच शासकीय कार्यालयाला मार्चअखेरीस करवसुलीचे वेध लागल्याने प्रत्येक कार्यालया प्रमुखासमोर वसुलीचे उद्दिष्ट असल्याने अशाच पद्धतीने तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतने थकबाकी भरणाऱ्यांसाठी बक्षीस योजना सुरू केली.तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी 39 गावात पिण्याच्या पाण्यासाठी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली.
सध्या या योजनेची पाणीपट्टी भरण्यासाठी शिखर समितीवर तगादा लावला जात आहे. मार्च ,एप्रिल ,मे महिन्यात प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निर्णायक ठरणार आहे मात्र या योजनेसाठी उचेठाण बंधाऱ्यातून पाणी पुरवठासाठी व जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा कायम राहण्यासाठी 39 गावातील ग्रामपंचायतीने आपली थकबाकी देखील वेळेत भरण्याची गरज आहे मात्र ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीमुळे शासकीय कराची थकबाकी भरण्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष होत आहे.
अशात यंदा पिक विमा, अवकाळीची नुकसान भरपाई अशा स्वरूपाची आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली नाही त्यामुळे विज बिल,बँकांची कर्जे व इतर देणी देण्याचे उद्दिष्ट समोर असताना सध्या ग्रामपंचायतीकडून तीन महिन्यात पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी थकबाकी वसुलीवर जोर दिला. विद्यमान गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील व विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे हे पंचायत समितीतील प्रमुख अधिकारी आज सेवानिवृत्त झाल्यामुळे पंचायत समितीचा कारभार हा प्रभारीवर येऊन ठेपला मात्र थकबाकीदारांची कर भरण्याकडे पाठ दिल्यामुळे कर वसुली होण्यासाठी ग्रामपंचायतीनी चक्क बक्षीस जाहीर केली.
थकबाकी वसुलीचे प्रमाण अतिशय कमी आहे.थकीत वसूलीतून तीन महिन्यातील दुष्काळी परिस्थितीत गावाला पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी ग्रामपंचायत कर भरावा.यासाठी 20 मार्चपर्यंत जे ग्रामस्थ 100% टक्के थकबाकी भरणार त्यांच्यासाठी फॅन,मिक्सर, इस्त्री, प्रेशर कुकर व पाण्याचे जार असे बक्षीस ठेवले.