इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनआणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे औचित्य साधत हिरकणी कक्षा चा शुभारंभ पायल माणगावे आणि ऐश्वर्या गंगावणे या महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने बुधवार महानगरपालिका इमारतीमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला स्थापन करणेत आला. यावेळी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपायुक्त तैमूर मुलाणी उपस्थित होत यावेळी महानगरपालिकेच्या सर्व विभागाकडीलमहिलांच्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचा शुभारंभ आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते करणेत आला. या शिबिरात डॉ मिनल पडीया यांनी महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, महिला बाल विकास अधिकारी सीमा धुमाळ, उप अभियंता राधिका हावळ, सहा. लेखापाल किरण मगदूम, ग्रंथपाल बेबी नदाफ, विधी अधिकारी खदिजा सनदी, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, तेजस्विनी सोनवणे, अलका पाटील यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.