“काही लोकांनी राजकीय दबाव टाकून माझं..” तेजस्विनी पंडितसोबत झालंय काय? 

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. तेजस्विनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

तिने अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही सर्वांना वेडं लावलं आहे. मात्र तेजस्वीनी काही दिवसांपासून तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. तिने यापुर्वी टोल मुद्यावर केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा झाली होती.

आता तेजस्वीनीच्या ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे तेजस्वीनी चांगलीच संतापली असल्याचं दिसतंय. तेजस्वीनी याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे.

अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका साकारणाऱ्या तेजस्विनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात तेजस्वीनीने नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. कारण यापुर्वी तिने टोल संदर्भात पोस्ट करत राज्य सरकारवर टीका केली होती. नेटकरी तिच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

यापुर्वी तिने देवेंद्र फडणवीसांचा टोल बाबतचा एक व्हिडिओ शेयर केला होता या व्हिडिओसोबत तिने लिहिले होते, “म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! हे “माननीय उपमुख्यमंत्री” यांचे विधान कसे असू शकते?अविश्वसनीय!! तुमचीही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!”.

आता या ट्विटनंतर तेजस्वीनीचे ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काढून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.