दोनच दिवसांपूर्वी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी वाळवा तालुक्यातील शिवपुरी येथे पोहोचले असताना अज्ञातनी वाघवाडीजवळ योजनेची पाईपलाईन फोडली त्यामुळे टंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
याप्रकरणी वारणा डावा कालवा विभागाच्यावतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .पोलिस संशियतांचा शोध घेत आहेत .अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फेब्रुवारीला वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी शिवापुर गावापर्यंत आले. यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असतानाच वाघवाडी गावचा हद्दीत गट क्रमांक 206 मध्ये अज्ञात यांनी जीसीपी मशीनच्या साह्याने योजनेची पाईपलाईन फोडली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
या घटनेनंतर या जमिनीचे मालक धनंजय सूर्यवंशी यांनी वारणा कालवे विभागाला याची माहिती दिली. या विभागाच्या अधिकाऱ्याने घटनास्थळी पाहणी केली .फोडलेल्या पाईपलाईन मधील पाणी गट क्रमांक 211 या क्षेत्रात साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल वारणा कालवे विभागाच्यावतीने आज्ञाताविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली.