इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रा. कृष्णा मंडले तर कार्याध्यक्षपदी भूषण शहा

गेल्या 23 वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात आविष्कार कल्चरल कार्यरत आहे. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्य करीत आहे. या संस्थेने राज्य व देशातील 75 होऊन अधिक दिग्गज कलाकारांच्या संगीत रजनी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रा. कृष्णा मंडले (कासेगाव), कार्याध्यक्षपदी भूषण शहा (इस्लामपूर), उपाध्यक्षपदी राजेंद्र माळी (इस्लामपूर) तर सचिव पदी विजय लाड (राजारामनगर) यांची निवड करण्यात आलेली आहे.