हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. प्रत्येक गावोगावी आपल्याला शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोच. प्रत्येक गावी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. पेठवडगाव मध्ये शिवजयंतीचा एक आगळावेगळा म्हणजेच न भूतो न भविष्यते कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम यशस्वी देखील झालेला आहे.
शिवजयंतीचा हा सोहळा पेठवडगाव मध्ये सहा दिवस साजरा करण्यात आला. म्हणजेच शिवजयंती निमित्त पेठवडगावमध्ये सहा दिवस अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते आणि हे कार्यक्रम अगदी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत.पेठवडगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर अगदी दुमदुमला होता. जिल्ह्यातील अनेक विविध भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.
पेठवडगाव मध्ये सलग सहा दिवस शिवजयंती निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पेटवडगाव मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावर्षी संयुक्त शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीने सलग सहा दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये रायबा हेच का आपले स्वराज्य हे महानाट्य तसेच, श्वान पळवण्याची स्पर्धा, म्हैस पळवण्याची स्पर्धा, उंट पळविने, रेकॉर्ड डान्स स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. शेवटच्या दिवशी पारंपारिक वाद्याच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले होते.युवा नेते मा. राजवर्धन पाटील, माजी नगराध्यक्षा मा. विद्याताई गुलाबराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अगदी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला आणि या सोहळ्याला यश देखील मिळाले.