जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त,आठ जणांवर गुन्हा दाखल

हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तीन मोटारसायकल, दोन मोटारीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.अझरुद्दीन कलंदर पठाण (वय २६), सोहेल रफिक बारगीर (वय ३२, दोघेही रा. आझाद चौक, हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), दीपक आनंदा जाधव (वय २७, रा. हेरले माळभाग),

अनिकेत पोपट कालगे (वय २७, रा. गंगारामनगर, टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सूर्यकांत वसंत मोटे (वय ४०, रा. विठ्ठल मंदिर, बागणी, ता. वाळवा, जि. सांगली), निखिल गंगाराम सगट ( वय २९, रा. राजेंद्रनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर), आसिफ अकबर देसाई (वय २७, रा. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली), सूरज बाबासो पोवार (वय २८, रा. मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

मौजे वडगाव ते नागाव रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याच्या बाजूस पाटील फार्म हाउसमध्ये अवैधरीत्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांच्या पथकाने सोमवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी तेथे अनेक दुचाकी वाहने होती;

पण पोलिस कारवाईचे संकेत मिळताच काहींनी पळ काढला. मात्र, आठ जणांना ताब्यात घेत पोलिसांनी दोन मोटारी, तीन मोटारसायकली, मोबाईल आणि रोख पंचावन्न हजार, असा सुमारे सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.