सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रेनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. यामध्ये बैलगाडी शर्यत तसेच घोडागाडी शर्यती सऱ्हास पहायला मिळतात. हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावातील श्री नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले होते. नरंदे येथील श्री नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन ग्रामपंचायत व यात्रा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. माजी खा. राजू शेट्टी व आ. अशोकराव माने यांनी उद्घाटन केले.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक पवार, निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, पशुधन अधिकारी माळी, जाधव, भाजप तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, नेर्ली तामगावचे सागर पाटील, गोपनीयचे संग्राम पाटील, तलाठी चौगुले, मंडल अधिकारी अरुण शेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये विष्णू पाटील, बंडा सिद्धेवाडी, शेठ बेळंकी, दादू चिंचणी, जनरल बिनदाती शर्यतीमध्ये- अवधूत डुबल, लक्ष्मण बडेकर, आदित्य खरात, बलू वावरे, घोडागाडी- दत्ता डोंगरे, गेणू आलास, पप्पू बोडके, सुट्टा घोडा खानदेव, मनस्वी पाटील यांनी क्रमांक मिळवले.
यावेळी पं. स. माजी उपसभापती राजकुमार भोसले, सर्जेराव भंडारी, बाळासाहेब भंडारी, संदीप शेटे, रमेश कुरणे, जगन्नाथ खोत, तुकाराम अनुसे, ग्रा. पं. सदस्य ऋषीकेश भोसले आदी उपस्थित होते. अमोल शेटे यांनी आभार मानले.