महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 65 कोटींच होणार स्टेडियम!

देशात सर्वत्र क्रिकेटप्रेमी आपल्याला पाहायला मिळतील. बीसीसीआयसुद्धा गुणवंत खेळाडूंसाठी नवनवीन गोष्टी करत असलेलं पाहायला मिळत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीनंतर आयपीएलमध्ये खेळाडूंना फ्रंचायसी पाण्यासारखा पैसा ओतून खेळाडूंना खरेदी करतात.

तिथे एकदा गडी चमकला की भारतीय संघात आपली जागा फिक्स करतो. यासाठी लहानपणापासूनच मुलांना क्रिकेटची आवड आणि प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारही आता पुढाकार घेत असल्याचं दिसत आहे. अशातच महाराष्ट्रातील मंत्र्याने स्टेडियमची मोठी घोषणा केली आहे.महाराष्ट्रातील बीडमध्ये स्टेडियमची होणार असल्याची घोषणा मंत्र्याने केली आहे.

‘नाथ प्रतिष्ठान’ आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर ही घोषणा केली गेली. परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयासमोर सुरू असलेल्या नामदार चषक स्पर्धेचा आज फायनल सामना होता. जेकेसीसी विरुद्ध जय श्रीराम या दोन संघात फायनल सामना झाला, यामध्ये जय श्रीराम संघाने हा सामना दोन विकेटने जिंकला.

या सामन्यावेळी युवराज सिंग आणि जहीर खान उपस्थित होते.युवराज सिंग, झहीर खान आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एक लाखाचे बक्षीस देऊन या टीमचं अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत उभारणार स्टेडियम 65 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.

टीम इंडियाचे स्टार खेळाडू झहीर खान आणि युवराज सिंह यांनी या सामन्याला उपस्थिती लावली होती. झहीर खानने यावेळी मराठीमध्ये भाषण करत सर्व खेळाडूंना मेहनत करत राहा, असं आवाहन केलं.