आटपाडी तालुक्यातील ५३ गावांत एकाच दिवशी प्लास्टिक कचरा निर्मूलन अभियानामध्ये सहभाग नोंदवत शेकडो किलो कचरा संकलन करण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा संकलित करण्यात सहभाग नोंदवला होता.
दरम्यान संकलित केलेला हा प्लास्टिक कचरा प्रक्रियेसाठी कंपन्यांना वजनावर विकला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांनी चार दिवसांपूर्वी या प्लास्टिक संकलन मोहिमेचे नियोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या १८२ आणि माध्यमिक ४२ शाळांना याची पूर्वकल्पना दिली होती. तसे पूर्वनियोजन केले होते.