आटपाडी येथील रस्त्यांचे रुंदीकरणाला मिळणार गती! सुहास बाबर

आटपाडी शहरातील विविध कामांचा आढावा व मुख्य रस्त्याच्या कामासंदर्भात पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, दत्तात्रय पाटील, रवी
सातारकर, अमोल मोरे, सभापती संतोष पुजारी उपस्थित होते. यावेळी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या
प्रयत्नांतून मंजूर झालेल्या ग.दि.मा. नाट्यगृह, उपजिल्हा रुग्णालय या कामाची पाहणी केली. आटपाडी शहरातील साई मंदिर चौक, एसटी बसस्थानक, शेटफळे चौक, नगरपंचायत कार्यालय ते पोलिस ठाणे चौक यापर्यंतचा रस्ता १४ मीटरचा होणार असून, यामध्ये रस्ता ११ मीटर दोन्ही बाजूस दीड-दीड मीटर गटार व दोन्ही बाजूस पथदिवे करण्यात येणार आहेत.

वीस कोटी रुपयांचा सध्या रस्त्याला निधी आला असून, निधी कमी पडल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकचा निधी आणला जाईल अशी माहिती सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपाध्यक्ष सुहास बाबर, तानाजी पाटील यांनी दोन्ही कामांना गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी राजेश नांगरे, बाळासो होनराव, मनोज नांगरे- पाटील, विजय देवकर, वैभव बोराडे, नितीन नांगरे उपस्थित होते.

आटपाडीतील साई मंदिर ते अण्णाभाऊ साठे चौकपर्यंतच्या प्रशस्त रस्त्यासाठी २० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत याची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीश बुर्ले, शाखा अभियंता प्रतिक शिंदे, अनिकेत जाधव, अमोल सुतार यांनी माहिती दिली.