कबनूर उरुसानिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रम घ्यावेत….


करमणुकीच्या कार्यक्रमांना फाटा देऊन सामाजिक व समाजाला प्रबोधन करणारे कार्यक्रम उरुसाच्या निमित्ताने
आयोजित करावेत, असे प्रतिपादन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी.आय. राजू तहसीलदार यांनी केले. कबनूर उरुसाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, धार्मिक कार्यक्रमात कोणतीही अडचण येणार नाही परंतु सर्व नियोजन हे कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे लागेल.

ऊरुस आनंदाने साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन सहकार्याच्या भूमिकेत असेल. विविध कारणांसाठी लागणारे परवाने व महसूल विभागाचे लागणारे सहकार्य विभाग करेल, असे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी सांगितले. उरुसाचे स्वरूप काय असावे याबद्दल शकील मुजावर, अजित खुडे, उत्तम जाधव, दत्ता शिंदे, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर यांनी आपली मते मांडली. डिजिटल बोर्डमुक्त, महिलांना सबलीकरण करणारे व विद्यार्थी व खेळाडूंना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम करावे याबाबत गुरुवार ता. ७ मार्च रोजी बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.