टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त भागात पोहोचविण्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि त्यामुळेच दुष्काळाचे उच्चाटन झाले. आटपाडी तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव अग्रभागी राहिलेल्या या नेतृत्वामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न देखील सोडविण्यात आले.
आटपाडी शहरांमध्ये गदिमा नाट्यगृह, उपजिल्हा रुग्णालय, पीडब्ल्यूडी कार्यालय, पोलीस ठाण्याची इमारत, शहरातील अंतर्गत रस्ते, साई मंदिर ते अण्णाभाऊ साठे चौक रस्ता, संरक्षक भिंत, तलाव परिसर सुशोभीकरणाच्या अनेक कामांना आमदार म्हणून अनिल भाऊंनी न्याय दिला व त्यातून कोट्यवधींचा निधी आटपाडी तालुक्याला येऊन अनेक विकास कामे देखील करण्यात आली.
विकासकामांची तीच गती कायम ठेवण्यासाठी युवानेते सुहास भैया बाबर पाठपुरावा करत आहेत. अनिल भाऊंनी जी जनसेवा केली तीच गती सुहास भैया बाबर यांनी कायम ठेवलेली आहे. लोकांसाठी 24 तास उपलब्ध होऊन त्यांना नम्रतेने न्याय दिला जात आहे. आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीन विकासाचा महामार्ग दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांनी निर्माण केला आणि त्याच कामांचा कृतिशील वारसा सुहासभैया बाबर चालवत आहेत. तीच गती कायम ठेवली आहे.
लोकांसाठी 24 तास उपलब्ध होऊन त्यांना त्यांची अनेक प्रश्न सोडवण्यास सुहास भैया बाबर यांनी कायम प्रयत्न केलेले आहेत. अनिल भाऊंनी प्रस्तावित केलेली आटपाडी शहरासाठीची 85 कोटींची पाणी योजना मार्गी लावण्याचे काम सुहासभैया बाबर, तानाजीराव पाटील यांनी केले. शिवाय टेंभूच्या सहाव्या टप्प्याची निविदा काढण्यात यश देखील आलेले आहे. शिवाय तब्बल 777 कोटींच्या सिमेंट रस्त्यांना शासनाकडून न्याय मिळवून देण्याचे काम हे सुहास भैयांनी केलेले असून त्यांच्या रूपात अनिलभाऊंचे दर्शन जनतेला होत आहे.
