रोटरी क्लब सामाजिक कार्यात अग्रेसर..

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेन्ट्रलच्या वार्षिक भेटीप्रसंगी बोलताना प्रांतपाल नासिर बोरसादवाला, केवळ आपल्या भागातच नाही तर जगभरात सर्वत्र होकारार्थी आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आंतरराष्ट्रीय रोटरी संस्था कार्यरत आहे. समाजासाठी उपयुक्त असे काही देण्याची भावना ठेवून रोटरी सदस्य जगभरात काम करतात.
रोटरी संस्था सर्वत्र आशादायी सामाजिक कार्य करीत असून रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल हा क्लब अशा कार्यात अग्रेसर आहे, अशा आशयाचे उद्गार रोटरी प्रांत ३१७०चे प्रांतपाल नासिर बोरसादवाला, कोल्हापूर यांनी काढले. येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या अधिकृत वार्षिक भेटीप्रसंगी बोलताना प्रांतपाल नासिर बोरसादवाला, नितीनकुमार कस्तुरे व . रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या अधिकृत वार्षिक भेटीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या हस्ते गरजू महिलांना पिको मशिन्स, शिलाई मशिन्स तसेच गारमेंट मशिन्स वितरित
करण्यात आली. तसेच स्टोअरवेल, सिलिंग फॅन आणि ब्लॅक बोर्डस् इत्यादी शैक्षणिक साहित्य नूतन मराठी विद्यालयास देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब सेंट्रलच्या डायनॅमिक या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.