इस्लामपुरातील उरुण चावडी इमारत धोकादायक!

इस्लामपूर शहरातील उरुण चावडीची स्वातंत्रपूर्व काळापासून असलेली दगड मातीची जुनी इमारत होऊन धोकादायक बनली आहे. याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे .त्यामुळे संभाव्य हानी टाळण्यासाठी तातडीने येथे नवीन इमारत बांधावी. तसेच तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय तात्पुरते स्थलांतरित करण्यात यावे, अशी केली जात आहे.
उरुण चावडीची नवीन इमारत होईपर्यंत पालिकेने वाकोबा मंदिराजवळ बांधलेल्या इमारतीमधील ५ गाळे महसूल विभागाने संपादित केल्यास तेथे तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरळीत चालेल.याबाबत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले आहे. त्यावर दादासाहेब पाटील, अभिजित कुर्लेकर, अभिजित रासकर, अंकुश जाधव, स्वरूप मोरे, दिग्विजय पाटील. शकील जमादार.
संगीता कांबळे, हिंदुराव माळी, शहाजी पाटील, आनंदराव मलगुंडे, विशाल सूर्यवंशी, खंडेराव जाधव यांच्या सह्या आहेत.
उरुण चावडीची इमारत जुनी होऊन धोकादायक बनली आहे. चावडी अंतर्गत उरूणसह महादेवनगर
कर्मवीरनगर, अनंतनगर, केएनपी नगर, राजारामनगर, यशोधननगर, अक्षर कॉलनी, साठेनगर, संत सेवालाल नगर अशा परिसरातून ज्येष्ठ नागरिक, विविध दाखले घेण्यासाठी येतात. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होते. जिल्हा नियोजन आणि विकास समितीतून नावीन्यपूर्ण योजनेतून ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून नवीन इमारतीचे काम सुरू करावे, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.