‘पार्ले-जी की डार्क पार्ले-जी?

पार्ले-जी हे देशातील सर्वाधिक आवडीचे बिस्किट आहे. गेली अनेक दशके त्याची लोकप्रियता टिकून आहे. हे बिस्किट प्रत्येकाने एकदा तरी खाल्ले आहे. ८५ वर्षे जुने असलेले हे बिस्किट चहाच्या वेळी स्नॅक म्हणून प्रसिद्ध आहेच.

शिवाय ते देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ब्रँडपैकी एक आहे. सध्या पार्ले-जी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याला कारण म्हणजे ‘पार्ले-जी’च्या नवीन फ्लेवरचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. “डार्क पार्ले-जी” या नावाने तो इंटरनेटवर फिरू लागला आहे. यामुळे साहजिकच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अनेक सोशल मीडिया यूजर्संनी या आयकॉनिक बिस्किटच्या चॉकलेट फ्लेवरबद्दल अंदाज काढायला सुरुवात केली आहे. यावरुन मायक्रोब्लॉगिंग साइटवर मीम्स शेअर केले जात असून त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या जात आहेत. दरम्यान, पार्ले प्रॉडक्ट्सकडून याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नसतानाही ‘डार्क पार्ले-जी’वरून X वर मीम्स, पोस्ट आणि त्यावर कमेंट्सचा पाऊस पाऊस सुरु आहे.काही लोकांनी X वर अस्तित्वात नसलेल्या उत्पादनाची काल्पनिक रिव्ह्यूदेखील पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.