महाशिवरात्रीनिमित्त इचलकरंजी गावभाग महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

इचलकरंजी शहरामधील गावभाग येथील महादेव मंदीर हे पुरातन ग्रामदैवत असुन शिवभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. इचलकरंजी नगरपालिकेने ३१ मार्च १९६७ रोजी महादेव मंदीराचा जिर्णोद्धार केला होता.त्यानंतर बऱ्याच वर्षापासुन सदर मंदीराचे काम झालेले नव्हते. मात्र आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सन २०२३ मध्ये श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारीमहाआरतीस आले असता त्यांना मंदीरातील बऱ्याच कामांची माहिती दिली गेली.

त्यांनी मंदीराची प्रत्यक्ष पाहणी करुन येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत मंदीराची सर्व कामे पुर्ण करुन देणेचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे पाठपुरावा करुन मंदीराचे रंगकाम, पत्रे बदलणे, डागडुजी व सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविणे, मुर्तीचे रंगकाम अशाप्रकारची कामे पुर्ण केली गेली.

इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरातील पुरातन ग्रामदैवत महादेव मंदीराचे जिर्णोद्धार हे महाशिवरात्रीच्या अगोदर पुर्ण झाले आहे. उद्या शुक्रवार ता. ८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता महाआरती व त्यानंतर खिचडी प्रसादाचे वाटप होणार आहे व शनिवार ता. ९ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. बऱ्याच वर्षानंतर मंदीरातील कामे चांगल्या प्रकारे झाल्याची भावना सर्व भक्तांच्या मनामध्ये आहे.