मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर राज्य सरकाराने मराठा समाज मागस असल्याचा अहवालानुसार १० टक्के आरक्षण दिले.या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत कुठलीही भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहील, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे.