भरदिवसा कोरोची तिळवणी मार्गावर स्क्रॅप व्यावसायिकाला रस्त्यात अडवून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी लुटले. चाकूचा धाक दाखवत खिशातील रोख ७९ हजार ५०० रुपये काढून घेत जबरी चोरी केली. याबाबतची फिर्याद प्रदीप माळी (रा. कोरोची) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. चौघांनी माळी यांना मारहाण करत लुटल्याने झटापटीत हाताला चाकूचा वार झाल्याने ते जखमी झाले. चौघे परप्रांतीय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून त्यांचा शोध शहापूर पोलिसांकडून सुरू आहे.
घटनास्थळी व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, स्क्रॅप वेबसाईट प्रदीप माळी यांचा लक्ष्मी इंडस्ट्रीज हातकलंगले येथे व्यवसाय आहे.बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झटापटीत व्यावसायिक जखमी इचलकरंजीतील एका बँकेतून रोख
५० हजार रुपये काढले. त्यानंतर कोरोची येथील एका स्क्रॅप व्यापाऱ्याकडून २९ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर अशी रोख ७९ हजार ५०० रुपये घेवून ते लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील वे ब्रिज कडे निघाले.कोरोची तिळवणी मार्गावरील ओढ्याजवळ आले असता त्यांना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चौघांनी गाठले.
विनानंबर प्लेट दुचाकी आणि तोंडाला रुमाल बांधलेले व हेल्मेट घातलेले अशा चौघांनी माळी यांना मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून खिशातील रोख ७९ हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी माळी यांनी प्रतिकार केला असता एका संशयितांने कटर काढून माळी यांच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. तर एकाने कटरने माळी यांच्या पॅन्टचा उजवा खिशा ओढून फाडला, खिशातील ७९ हजार ५०० रूपये जबरदस्तीने काढुन घेतले. त्यांनंतर दोघे संशयित बीअर बारला लागून असलेल्या शेताच्या वाटेवरून पसार झाले. तसेच दोन हेल्मेट घातलेले दोघे मोटरसायकल वरुन कोरोची गावाच्या दिशेने निघुन गेले. सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांचा शहापूर पोलिसांकडून शोध सुरू आहे.