येत्या १ एप्रिलापासून वीज दरात…..

टाटा वीज कंपनीच्या निवासी ग्राहकांना धक्का बसणार आहे. कंपनीच्या वीज दरांस वाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. ही दरवाढ येत्या एक एप्रिलपासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीपेक्षा २४ टक्के जास्त दर टाटा कंपनीच्या वीज ग्राहकांचे असणार आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी सरासरी २४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मंजुरी दिली. दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी ही वाढ आहे. परंतु एकूण १०१ ते ५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी ही दर वाढ अधिक असणार आहेत.टाटा कंपनीने निवासी ग्राहकांसाठी दरवाढीचा प्रस्ताव आयोगापुढे सादर केला. त्यास जोरदार विरोध झाला होता.

त्यानंतर कंपनीने सुधारित दर प्रस्ताव सादर केला होता. कंपनीने गेल्या दोन वर्षांत या संवर्गासाठी आयोगाने मंजूर केलेली दरवाढ लागू केली नव्हती. त्यामुळे आता हे दर वाढविले जाणार आहेत. यामुळे आता ०-१०० युनिटसाठी विजेचे दर ५.३३ असणार आहे. हे दर ५०१ पेक्षा जास्त युनिटसाठी १५.७१ असणार आहे.