IND vs ENG : ‘रोहित-शुभमन’ यांची धडाकेबाज कामगिरी, शतकांचा पाऊस!

‘रोहित-शुभमन’ यांनी धर्मशाला कसोटी सामन्यात शतकं ठोकली.रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडविरोधात पहिल्या डावात आघाडी घेतली.कुलदीप यादव आणि आर.अश्विन यांनी इंग्लंडला 218 धावांत रोखलं.भारताकडे सध्या 46 धावांची आघाडी आहे.

लंचसाठी खेळ थांबला तेव्हा शुभमन गिल 101 तर रोहित शर्मा 102 धावांवर खेळत आहे.भारताचा कर्णधार रोहित शर्मानं धर्मशाला कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकले. रोहित शर्मान 154 चेंडूमध्ये शतक ठोकले. इंग्लंडविरोधात मालिकेतील रोहित शर्माचे हे दुसरं शतक होय. 

पहिल्या दिवशी रोहित शर्मा यानं टिच्चून फलंदाजी केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात रोहित शर्मानं शतक पूर्ण केले.रोहित शर्मानं 155 चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान त्यानं 3 षटकार आणि 13 चौकार लगावले.रोहित शर्मानंतर शुभमन गिल यानेही शतक ठोकले. शुभमन गिल यानं 138 चेंडूत शतक ठोकले.शुभमन गिल यानं 5 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. यशस्वी जायस्वाल बाद झाल्यानंतर शुभमन गिल यानं रोहित शर्माला साथ दिली.