अमित शाहांच्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत बैठक!

लोकसभेच्या जागावाटपा संदर्भात भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जागा बदल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची काही तिकीट कापण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.भाजप आणि शिवसेनेमध्ये तीन ते चार जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी कांग्रेस (NCP) पक्षामध्ये देखील उमेदवारांमध्ये काही बदल होण्याचे संकेत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर येत आहेत.सध्या लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबतं सुरु असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची केल्याची सूचना गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.

काही उमेदवार बदलण्याबाबत शाह यांनी सूचना केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना साशंकता असल्याचं समजत आहे. अजित पवार मात्र जागा वाढवण्याची मागणी करत असल्याचं सांगितलं जात आहे.अजित पवारांना तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे.

वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रामटेक, पालघर, हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरुर, रायगड, परभणी या जागा मिळू शकतात, तर शिर्डी आणि यवतमाळचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.