इचलकरंजीत पाण्याची तीव्र पाण्याची टंचाई जाणवते. अशातच सारखी नलिकेला गळती लागत असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागते. इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी खालावल्याने तसेच पाण्याला काळपट रंग आल्याने पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरला एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता दोन दिवसांतून एकदा होणार आहे.
त्यामुळे पाणी पातळी खालावल्याने उपसा बंद नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र आधार घ्यावा लागणार आहे. इचलकरंजी शहरास पंचगंगा व कृष्णा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा व कृष्णेची पाणी पातळी योग्य असल्यामुळे एकदिवसाआड पाणी पुरवठा होत होता.
मात्र, पंचगंगा नदीची पातळी खालावल्याने तसेच पाण्यास काळपट रंग आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.