इचलकरंजीत महाशिवरात्री उत्साहात!

महाशिवरात्रीचा दिवस हा महाउत्सव म्हणून ओळखला जात असल्यामुळे शहरातील सर्वच शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. यादिवशी शिवलिंगाच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याची प्रथा आहे.

महाशिवरात्रीच्या दिनी शिवलिंगावर पाण्याचा, पंचामृताचा, महारुद्राभिषेक, पांढरी फुले, बेल वाहण्यात आले. त्यानंतर रुद्रपठण, पूजा, आरती, पालखी सोहळा, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम पार झाले.

शहरातील विविध ठिकाणच्या शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच महाभिषेक, रुद्राभिषेक, स्तोत्रपठण असे धार्मिक विधी व कार्यक्रम पार पडले. येथील गावभागातील महादेव मंदिर, मॉर्डन हायस्कुलजवळील शिवमंदिर, नदीकाठावरील शिवमंदिर, मंगलधाम परिसर, मधुबन हौसिंग सोसायटीतील स्वयंभू शिवमंदिर, यड्राव (ता. शिरोळ) येथील ओंकारेश्वर मंदिर यासह शहर परिसरातील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट करण्यात आली होती.

ओम नमः शिवाय चा अखंड जप अन् हर हर महादेव जयघोषात शुक्रवारी शहर परिसरात महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांत पहाटेपासून गर्दी केली होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर आवारात फुलांच्या माळा, विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

पहाटे मंदिरात विशेष पुजा बांधण्यात आल्याने शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. दिवसभर भाविक शिवलिंगावर दुध, पंचामृत, ऊसाचा रस यासह महारुद्राभिषेक करत होते. तसेच रुद्रपठण, पूजा, आरती, पालखी सोहळा, भजन, कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते.