जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संविधान परिवारच्या वतीने आयेशा मस्जिद येथे सुरु केलेल्या अभ्यासिकेला ग्रंथभेट प्रदान केली.
यावेळी मशिदीचे पदाधिकारी दस्तगीर सदुले, वाजिद तासगावे, फिरोज कनवाडे म्हणाले की,सध्या या अभ्यासिकेच्या सुविधेचा 40 विद्यार्थी लाभ घेत आहेत. लवकरच सुसज्ज ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या भेटीत ‘हर घर पदवीधर’ असा संकल्प एकत्रितपणे पार पाडण्याचा निश्चय करण्यात आला.
यावेळी सदर अभ्यासिकेला सृजन प्रकाशनच्यावतीने ग्रंथभेट प्रदान करण्यात आली. यावेळी अमोल पाटील, सौरभ पोवार, रोहित दळवी, वैभवी आढाव, साद चाॅदकोटी, रूचिता पाटील, दामोदर कोळी अमित कोवे, कोमल माने, आदित्य धनवडे, प्रशांत खांडेकर आणि अली डफेदार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.