करगणीत उद्या रविवारी महाआरोग्य शिबिर…..

आटपाडी सेवासदन लाइफलाइन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आटपाडी व उमेश पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने करगणी येथे रविवारी (दि. १०) सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत खंडोबा मंदिरसमोर, आटपाडीरोड येथे होणार आहे. महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरामध्ये हृदयविकार, बायपास, मेंदूविकार शस्त्रक्रिया, नेत्रतपासणी, बी. पी., साखर चाचणी, कोलोस्टेरॉल चाचणी, क्रिएटिन चाचणी, एच.बी, एएसजी चाचणी, अॅन्जिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, बायपास, फिट, पॅरेलिसिस, डोकेदुखी, चक्कर येणे, मूळव्याध, स्नायूंचे आजार, हर्निया, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, पोटांच्या तक्रारी याची तपासणी केली जाणार आहे. तसेच
शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार गरज पडल्यास ई.सी.जी. / इको / टी.एम.टी. / अॅन्जिओग्राफी सवलतीच्या दरात करून दिली जाणार आहे.