महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या काम वेगाने सुरू झाले आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे.
या मंदिरातील गाभारा दुरूस्तीसाठी येत्या शुक्रवारपासून (ता.15 मार्च) विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली.
या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांना दिली.