सांगोला येथील कडलास रोडवरील सांगोला महाविद्यालयात शेजारी खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्ररोग व किडनीचे आजार आणि संबंधित शस्त्रक्रियांचे मोफत निदान व उपचार उपलब्ध झाले आहेत. अशी माहिती खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर परेश खंडागळे यांनी दिली.
शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत हे उपचार पूर्णतः मोफत दिले जाणार आहेत.
हॉस्पिटलमध्ये पुढील रोगांवर उपचार केले जातात. मूत्ररोग . प्रोस्टेट ग्रंथींची सूज, मूतखडा , किडनी व मूत्रपिंडांचे आजार , किडनीतील खडे ,मूत्रमार्गात खडे या सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार व निदान केले जाणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे; पांढरा,केशरी किंवा पिवळा रेशनकार्ड,आधारकार्ड,बँक पासबुक आणि जन्माचा दाखल . घेताना सोबत आणावी असे आव्हान खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर परेश खंडागळे यांनी केले आहे.
