कडेगाव शहरासह तालुक्यात वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नाभिक समाज्याच्यावतीने डोंगराई मंदिर येथून सकाळी ७ वाजता कडेगाव शहरातील भैरवनाथ मंदिर चौक येथे ज्योत आणण्यात आली. ज्योत तसेच वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त भैरवनाथ मंदिर येथे भजन तसेच फुले अर्पण आणि भोजनाचा कार्यक्रम झाला.
कडेगाव तालुक्यात वीर शिवा काशीद पुण्यतिथी
