महाराष्ट्र पोलीस भरती! असा करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर केली आहे. अधिसुचनेनुसार, १७,४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार ३१ मार्चपर्यंत https://mahapolice.gov.in आणि https://policerecruitment2024.mahait.org वर त्यांचे अर्ज करू शकतात.

संघटना – महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग

पदाचे नाव -पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन

रिक्त पदे -१७,४७१

श्रेणी – सरकारी नोकरी

नोंदणी तारखा – ०५ ते ३१ मार्च

निवड प्रक्रिया – शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी, लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी

नोकरीचे स्थान – महाराष्ट्र

अधिकृत संकेतस्थळ -https://mahapolice.gov.in , https://policerecruitment2024.mahait.orgअर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना रु.४५०, तर मागासवर्गीय उमेदवारांना रु. ३५० अर्ज शुल्क भरावा लागेल.