इचलकरंजीच्या या भागात घाणीचे साम्राज्य! नागरिकांतून नाराजी….

इचलकरंजी शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या या उद्भवतच असतात. शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न तर खूपच जोर धरत आहे. अशातच शहरातील अनेक ठिकाणी गटारींची नियमित स्वच्छता व ड्रेनेज तसेच कचरा उठाव होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी येत आहे. लाल नगर तसेच सुतारमळा परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे.

याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास शहरातील कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारात आणून टाकणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

इचलकरंजी शहरातील लाल नगर, सुतारमळा परिसरातील गटार तसेच ड्रेनेज गेल्या अनेक काळापासून तुंबून घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

हे गटारीचे काम गेल्या अनेक काळापासून रखडलेले दिसून येत असून खराब मोडलेल्या गटारीमुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे आणि यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे गटारींची स्वच्छता करावी, वेळेत कचरा उठाव करावा अन्यथा शहरातील कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारात आणून टाकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.